नांदेड| शहरात व जिल्हयात चोरी छुप्या मार्गाने होत असलेल्या आंमली पदार्थ गांजाचे आवक व विक्रीची गोपनिय माहिती हस्तगत करुन, त्याचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी वेगवेगळे पथके नेमुन त्यांना नांदेड शहरातील व जिल्हयातील आंमली पदार्थ गांजाचे आवक व विक्रीची गोपनिय माहिती काढुन कार्यवाही करणे बाबत आदेशित केले होते.
दिनांक 08.01.2024 रोजी पोलीस उप निरीक्षक श्री. दत्तात्रय काळे यांना गोपनिय माहिती मिळाली की, नांदेड शहरात आंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी गांजा घेवुन काही इसम नांदेड शहरात येणार आहेत. या मिळालेल्या माहिती प्रमाणे त्यांनी वरिष्ठांना माहिती देवुन, राजपत्रित अधिकारी यांना बोलावुन घेवुन, अधिकारी, पंच व स्टाफसह पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्यीत छापा मारुन, आरोपी नामे 1. शेख अनिस शेख सलीम रा. नई आबादी, शिवाजीनगर, नादेड 2. शेख इम्रान शेख अहेमद रा. तेहरानगर, नांदेड 3. भुजंग निवृत्ती जोंधळे रा. आंबेडकरनगर, नांदेड या आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण रु. 1,08,000/- चा आंमली पदार्थ गांज्या जप्त केला आहे. यातील आरोपीतांना सदरचा गांज्या हा आरोपी हामीद खान गौस खान रा. नई आबादी, शिवाजीनगर, नांदेड याने विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगीतले आहे. तो गुन्हयात फरार आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे शिवाजीनगर, नांदेड येथे एन. डी. पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड मा. श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, नायब तहसिलदार, श्री. के. बी. डांगे, तहसिल कार्यालय, नांदेड, पोलीस उप निरीक्षक, श्री. दत्तात्रय काळे, श्री. आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, गजानन बयनवाड, विलास कदम, रणधीर राजबंशी, धम्मानंद जाधव, राजु पुलेवार, महिला पोलीस अंमलदार किरण बाबर व चालक श्रीरामे, कलीम शेख यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे कामगीरीचे मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.