नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतिने शनिवारी दि. ६ जानेवारी रोजी बाळशात्री जांभेकर यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर हे होते तर व्यासपीठावर माजी जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, जिल्हाउपाध्यक्ष सुभाष पेरकेवार , तालुका अध्यक्ष गजानन चौधरी, दिलीप वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाळ शात्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर पत्रकार संघाच्या वतिने तालुक्यातील सर्व पत्रकारांचा वही पेन, लेखणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. दिवस किती वाईट व संकटाचे आले तरी पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जोपासून लिखान केले पाहिजे. तत्वाला कसलीही तडजोड करता कामा नये,तसेच तालुक्यातील पत्रकारांनी एकोप्याने राहावं असे मत अध्यक्षीय समारोपात सूर्यकांत सोनखेडकर यांनी व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांनी पत्रकारीतेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार घोषित करण्यात आल्याबद्दल तसेच रामप्रसाद चन्नावर आणि गजानन चौधरी यांची आम्ही वारकरी संप्रदायात प्रशिध्दी पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला, यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले. यावेळी पंडित वाघमारे, लक्ष्मण बरगे,डॉ.दयानंद माने, रामप्रसाद चन्नावार. कैलास तेलंग. टेंभुर्णीकर ,मनोहर मोरे, आनंदराव सुर्यवंशी. रामराव पा. ढोगे,गोविद नरसीकर, शेषेराव कंधारे, विकास भुरे, रामराव ढगे. माधव बैलकवाड,सत्तार इनामदार, तानाजी शेळगावकर, बालाजी हणमंते,यशवंत मोरे, आनंदराव डाकोरे, प्रकाश महिफळे, अंकुश देगावकर, शेख आरीफ, हणमंत चंदनकर, मारोती बारदेवाड,अजिम नरसीकर, साहेबराव धसाडे , दिगांबर झुंबाडे,देवराव नारे, सहदेव तुरटवाड.पमेश्वर जाधव, रामकृष्ण मोरे, ज्ञानेश्वर तोडे,भद्रे धम्मदिप, दिपक गजभारे , शेषेराव बेलकर, किरण वाघमारे, प्रशांत वाघमारे, गणेश कंदुरके. यांच्या सह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर गंगासागरे यांनी केले तर आभार नरसीकर यांनी मानले.