नांदेड| पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कण्डेय ऋषीं यांचा जन्मोत्सव १२ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. दरवर्षी मार्कण्डेय जन्मोत्सव समिती नांदेड तर्फे चौफाळा मार्कण्डेय मंदिर ते जुना मोंढा परत चौफाळा मार्कण्डेय मंदिर या मार्गाने शोभायात्रा निघत असते. कोरोना काळात काही कारणास्तव ही शोभयात्रा स्थगित झालेली होती. त्या जागी सामाजिक समस्या बघता रक्तदान शिबीर हे दोन वर्ष घेण्यात आले.
परंतु या वर्षी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी महर्षी मार्कण्डेय जन्मोत्सव निमित्त मार्कण्डेय जन्मोत्सव समिती तर्फे भव्य शोभायात्रेसाठी प्रथम बैठक मार्कण्डेय मंदिर चौफाळा येथे घेण्यात आली या बैठकीत सर्व समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीत असे ठरण्यात आले कि चौफाळा मार्कंडेय मंदिर येथून शोभायात्रा काढून गंगाचाळ मार्कंडेय मंदिर येथे ह्या शोभायात्रेचा समारोप होणार आहे.गंगाचाळ मार्कंडेय मंदिर येथे ह्या शोभयात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था मंदिर समिती तर्फे करण्यात येणार आहे. सर्वात समोर घोडे,जीप्सी ज्यावर मार्कण्डेय प्रभूची प्रतिमा असणार, ढोलपथक, महिला एकाच वेशभूशेत कळस घेऊन, लेझिम पथक, वारकरी, भजनी मंडळ, मार्कण्डेय झाकी, विणकर झाकी, रथ अशी भव्य दिव्य शोभायात्रेचे स्वरूप राहणार आहे.
ह्या बैठकीत सर्व समाज बांधवाने आपले मनोगत व्यक्त केले आणि शोभयात्रेच्या तयारी साठी तन मन धनाने सोबत राहू असे मत मांडले. तसेच या शोभायात्रेसाठी या बैठकीत पद्मशाली समाज युनायटेड मराठवाडा युवक अध्यक्ष किशोर राखेवार व नगरसेवक नागनाथ गड्डम यांच्या कडून प्रत्येकी ११००० रु देणगी जाहीर केली व अनिल गाजूला यांनी ५००० स्टिकर देणार असे जाहीर केले व तसेच मार्कण्डेय जन्मोत्सव दिवशी समाज बांधवानी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सह परिवारा सह शोभायात्रेमध्ये सहभागी होणार असे जाहीर केले.मार्कण्डेय जन्मोत्सव समिती तर्फे मकर संक्रांती निमित्त महिलांचा कार्यक्रम घेणार तसेच समाजातील मंगल कार्यालय, वैकुंठ रथ, दवाखाना, जिम इत्यादी सर्व बाबी वर लक्ष देऊन समाजासाठी उपलब्ध करून देणार असेही सांगण्यात आले व सर्वात शेवटी सर्व समाज बांधवांचे आभार मानून बैठक संपन्न झाली.
यावेळी पद्मशाली समाज बांधवांची उपस्थित होती.