नांदेड| तेरा वर्षात आठ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे देणे हा जागतिक विक्रमच असून ज्याप्रमाणे भारतात नरेंद्र मोदी गरिबांसाठी विक्रमी योजना राबवित आहेत त्याप्रमाणे नांदेडमध्ये दिलीप ठाकूर हे ८५ सेवा उपक्रम राबवीत असल्यामुळे त्यांची तोड नसल्याचे प्रतिपादन भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी लायंसचा डबा या उपक्रमाच्या सहाव्या वर्धापनदिनी केले.
नूतन वर्षानिमित्त रयत रुग्णालय येथे झालेल्या रंगतदार कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, बाबा सुबेकसिंघ, शितल खांडील, बालाजी पुणेगावकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट, लायन्स अध्यक्ष ॲड. उमेश मेगदे, सचिव शिवाजी पाटील, एन्जॉय अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया, प्रतापसिंघ खालसा, परमवीरसिंघ मल्होत्रा , हॅपी बीसी ग्रुपचे अध्यक्ष अनिल चिद्रावार,योगेश नंदनवनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी लायन्सचा डबा उपक्रमाची २०२४ या वर्षाची नोंदणी सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.ज्यांना आपल्या परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त अथवा प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ अन्नदान करायचे असेल त्यांनी रू.दीड हजार भरून संबंधित तारीख आरक्षित करायची आहे.त्या राखीव दिवशी अन्नदात्यांच्या हस्ते रुग्णांच्या नातेवाईकांना डबे देण्यात येतात. शितल खांडील यांनी शुभेच्छा देताना दिलीप ठाकूर यांच्या कार्यामुळे भाजपाचे नाव समाजातील तळागाळापर्यंत पोंहचले असल्याचे सांगितले.
ॲड.मेगदे यांनी आपल्या भाषणातून लायन्सच्या डब्याची नोंद आंतरराष्ट्रीय लायन्स परिवारात झाली असल्याचे सांगितले. दिलीपभाऊ यांच्यासारखी सातत्यपूर्ण सेवा करणारी व्यक्ती दुर्मिळ असल्याचे सांगत ॲड. दागडिया यांनी विविध सेवाकार्याची माहिती दिली. नूतन फलकाचे उद्घाटन झाल्यानंतर रयत उपाध्यक्ष एम.आर.जाधव,प्रकाश उंटवाले,अशोक माडेकर, गौरव दंडवते,दिपेश छेडा यांच्या हस्ते डबे वितरित करण्यात आले. बलबीरसिंह ठाकूर,नागेश शेट्टी, रवी पोतदार,रागिनी जोशी, मिरा मोतेवार, भास्कर कोंडा,सुभाष देवकत्ते ,भूषण जोशी,धोंडोपंत पोपशेटवार, अविनाश पत्की, कृपालसिंघ हुजूरिया,शिवराज मुगावे या अन्नदात्यांचा सत्कार करण्यात आला.
स्नेहलता जायस्वाल, प्रमिला भालके, रुपेश वट्टमवार, द्वारकादास अग्रवाल, नीता दागडिया, सतीश शर्मा यांनी मायेची ऊब मध्ये सहकार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आला.लायन्सच्या डब्याला विस्तृत प्रसिद्धी दिल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. हॅप्पी बीसी ग्रुप तर्फे अनिल पाम्पटवार, मधुकर मोतेवार,महेश तांडुरवार, नरेंद्र नरवाडे यांनी दिलीप ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जयश्री व दिलीप ठाकूर यांचे भव्य पुष्पहार व केक कापून अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी नरेंद्र पटवारी, राजेश यादव, सतीश बेरूळकर, बिरबल यादव, शिवा शिंदे,सोनू उपाध्याय यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.
रेखा कवटकवार, अनिता चिद्रावार, विमल शेट्टी, निर्मला अग्रवाल, पद्मा कोंडा, दुर्गा पोतदार, सविता काबरा,उज्वला तांडूरवार, सुप्रिया सरोदे यांनी दिलीपभाऊंचे औक्षण केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन शिवा लोट यांनी तर आभार राजेशसिंह ठाकूर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास वाडेकर, सुरेश शर्मा, कामाजी सरोदे, रुपेश व्यास, सदाशिव कंधारे,चंद्रकांत कवटकवार,गिरीश शेळके, बाबुराव वाघमारे, विजय लाडे, विठ्ठल कांबळे यांनी परिश्रम घेतले.वर्षभरातील संपूर्ण ३६५ दिवसाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लायन्सच्या डब्याचे कॅलेंडर काढण्यात येणार असून त्यामध्ये प्रत्येक तारखेच्या अन्नदात्यांचा समावेश करण्यात येणार आहे.इच्छुकांनी राजेशसिंह ठाकूर ९४२२१ ८५५९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन लायन्सतर्फे करण्यात आले आहे.