भारतीय डाक विभागाची अपघाती विमा पॉलशी वार्षिक रुपये ३९९/ची भोकर शहरात आज पासुन विशेष मोहीम
भोकर/नांदेड| भारतीय डाक विभागाची अपघाती विमा पॉलिसी वार्षिक रुपये ३९९ रुपयात कधान्येत येणार आहे. भोकर शहरात आज पासुन हि विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, भोकर शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांसाठी आणि दोन चाकी व चार चाकी वाहन यांचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. डाक अधीक्षक श्री राजीव पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डाक निरीक्षक भोकर यांनी केले आहे.
भारतीय डाक विभागाची अपघाती विमा पॉलिसी विशेष मोहीम दिनाक २९ डिसेंबर २०२३ ते ३० डिसेंबर २०२३ भोकर शहरात च्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. अपघाती दहा लाख रुपये विमा बजाज आलियान्झ व टाटा एग पॉलिसी व वार्षिक हप्ता फक्त ३९९ रुपये मध्ये काढली जाणार आहे. ही योजना सर्व नागरिकांसाठी बजाज आलियानझ व टाटा एग अपघाती पॉलशी उपलब्ध असून यांची वार्षिक हप्ता फक्त ३९९/ रुपये मध्ये योजनेत खालील प्रमाणे फायदे मिळतील.
यासाठी खालील अटी व मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.
■ वयोमर्यादा १८ ते ६५
■ अपघाती मृत्यू-१० लाख रुपये.
■ कायमस्वरूपी अपंगत्व__१० लाख रुपये.
■ कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व—१० लाख रुपये.
■ अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेश—६० हजार रुपये.
■ अपघातामुळे बाह्यरुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस—-३० हजार रुपये.
■ दवाखाण्याचा ऍडमिट असे पर्येंत–एक हजार रुपये १० दररोज दिवस.
■ मुलांचा शिक्षणाचा खर्च—१ लाख रुपये प्रतिवर्षी फक्त दोन मुलांना.
■ कुटूंबाला दवाखाना प्रवास खर्च—-२५ हजार रुपये.
■ अंत्यसंस्कारासाठी लागणार खर्च—५०००/रुपये.
वरील अपघाती योजनांचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन डार्क विभागातर्फे करण्यात आले असून, सोबत आधार कार्ड व मोबाईल आणि ई मेल ID असणे आवश्यक आहे. इंडिया पोस्ट बँक खाते असेल तर फक्त ३९९ लागतील खाते नसेल तर रुपये ५५०/खर्च येईल यांची नोंद नागरिकांनी घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश सिंगेवार डाक मार्केटिंग अधिकारी नांदेड/भोकर मोबाईल क्रमांक 9405707010 संपर्क साधता येईल.