हिमायतनगर| किराणा दुकाण टाकण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपये घेवुन ये… तु काळी आहेस… असे म्हणून छोटया छोट्या कारणाने शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात मानकेश्वर ता.उमरेड जि.नांदेड येथील विवाहितेच्या सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 01.12 .2018 ते दिनांक 23.12 .2023 दरम्यान, यातील फिर्यादीचे सासरी मानकेश्वर ता.उमरेड जि.नांदेड येथे, यातील सात आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तु काळी आहेस, असे म्हणून किराणा दुकाण टाकण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपये घेवुन ये अशी पैशाची मागणी करून छोटया छोटया कारणावरून शिवीगाळ करून शारिरीक व माणसीक छळ केला.
अशी फिर्यादी 27 वर्षीय महिला यांनी दिल्यावरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुरनं 256/2023 कलम 498(अ), 504, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.डी.भूसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ//2303लायक शेख हे करीत आहेत.