हंडरगुळी/उदगीर/लातूर, विठ्ठल पाटील| दिनांक २४ डिसेंम्बर रोजी मराठे मुंबई मध्ये जाऊन विमानतळ,शेअर मार्केट,गेट वे आॅफ इंडिया,मंञालय,आमदार निवास आदी ठिकाणी भेट देऊ शकतात.अशी चर्चा गत कांही दिवसा पासुन सुरु आहे.
म्हणुन या व मराठा आरक्षण या विषयासंबंधी हाळी व परिसरातील समाजबांधवांचे म्हणणे काय.व पुढील दिशा काय.याबद्दलची माहिती जाणुन घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशान्वये हंडरगुळी पोलीस चौकी येथे आज दि.२३-१२-२३ रोजी स- ११ वा.शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.आणि या बैठकीत कर्तव्यदक्ष सपोनी. मा. भिमराव गायकवाड यांनी सखोलासे मार्गदर्शन केले. उपस्थित मराठा व अन्य समाज बांधवांचे मत जाणुन घेतले.यावेळी पोलिस प्रशासनाला सर्वत्तोपरिने सहकार्य करणार. आणि कायद्याच्या “अगेन्स” कुणी पण नाही जाणार.असा शब्द तथा वचन सकल मराठा समाज बांधवांनी गायकवाड Api यांना दिले.
तसेच छ.शिवाजी महाराज पुतळ्या भोवती तसेच मेन मार्केट मध्ये वेडीवाकडी थांबणा-या 2 चाकी वाहणांवर तसेच वाहतुकीस अडथळा करणा-या हातगाड्यांवर व राज्यमार्गालगत असलेल्या व B & C ने बांधलेल्या नालीवर व पुढे पुन्हा अतिक्रमण केलेल्यांवर तसेच जि.प. शाळेच्या कंपाऊॅंड भिंतीलगत 100 मिटरच्या आत असलेल्या गुटखा विक्री करणा-या सर्व टप-यांवर योग्य ती कारवाई करावी.तसेच ना बालक असलेल्या वाहनचालकांवर कडक कारवाही करावी.या सारख्या अत्यंत म्हत्वाच्या मागण्या उपस्थित सर्वांनी केल्या.तेंव्हा वरील मागण्यानुसार सर्व संबंधितांवर रितसर कारवाही करनार कुणी ही कायदा हातात घेऊ नये.व येत्या 8 दिवसात कारवाही करणार. असे मत सपोनी. भिमराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
तसेच या बैठकीस पोउपनी.गायकवाड एम.के. जमादार संजय दळवे पाटील,माधव सारोळे,सोनु सोनकांबळे, यांचेसह हाळीचे उपसरपंच राजू पाटील,भा. ज.पा.तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, रमन माने,जंटू माने,जिवन माने, शाहीर,ज्ञानेश्वर गायकवाड,पप्पू पाटील,पिंन्टू काळे,हमजा टेलर शेख,टप्पेवाले,शेख घुडू,शेख फारुख, बोळेगावे,शंकर तेलंग,विकास जाधव यांचेसह असंख्य नागरीक उपस्थित होते.