नांदेड| पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील रेकॉर्डवरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे आरोपीची योजना तयार करुन आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने चालु वर्षात 22 एम. पी. डी. ए. प्रस्तावाची संबंधीताकडुन चौकशी चालु आहे.
पोलीस ठाणे वजीराबाद यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे शबर मिर्झा गफार बेग वय 27 वर्ष रा खडकपुरा, नांदेड याचेवर गंभीर स्वरुपाचे दखलपात्र 22 गुन्हे दाखल असल्याने व इश्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले रा. चिखलवाडी, नांदेड याचेवर गंभीर स्वरुपाचे 28 गुन्हे दाखल असल्याने त्यांचेविरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे प्राप्त झाले होते. मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती.
त्यावरुन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हे धोकादायक असल्याने आरोपी नामे 1) शबर मिर्झा गफार बेग वय 27 वर्ष रा खडकपुरा, नांदेड 2) इश्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले रा. चिखलवाडी, नांदेड यांना एक वर्षाकरीता छत्रपती संभाजीनगर कारागृहात MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द केल्याबाबतचे आदेश आज रोजी पारीत केले आहे. नमुद दोन्ही आरोपीतांना औरंगाबाद कारागृहामध्ये स्थानबध्द करण्याची प्रक्रिया चालु आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील चार गुन्हेगांराना MPDA कायद्याअंतर्गत कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या सहा झाली आहे.