नांदेडसोशल वर्क

विकसित भारत संकल्प यात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड| शासकीय योजनांप्रती प्रत्येक गावात विश्वासर्हता निर्माण व्हावी, लोकांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन व्हावे यादृष्टीने विकसित भारत संकल्प यात्रेला ग्रामीण भागात उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. शेंबोली येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.

सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे, त्यांना जीवन जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे, आरोग्यापासून निवासापर्यंत सुविधा मिळाव्यात, शिक्षणासह स्वयंरोजगाराचे मार्ग समृद्ध व्हावेत यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. लोकांच्या मनामध्ये शासकीय योजनांप्रती ज्या काही धारणा आहेत त्या या यात्रेतून अधिक भक्कम होण्यास मोलाची मदत होत आहे.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून ही यात्रा प्रत्येक लाभधारकापर्यंत पोहोचावी यादृष्टिने चोख नियोजन केले आहे. आज शेंबोली येथील कार्यक्रमात ज्यांची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत व ज्यांनी मतदार ओळखपत्रासाठी नाव नोंदणी केली अशा युवकांचा सत्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुदखेडचे तहसीलदार मुगाजी काकडे, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, तालुका आरोग्य अधिकारी गुट्टे, महिला बाल विकास अधिकारी श्रीमती पुणे, आरोग्य अधिकारी कासराळीकर, विस्तार आधिकारी लतीफ यांच्यासह तालुकास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!