नवीन नांदेड| हिंगोली जिल्ह्याचे शिवसेनेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको येथील महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालयात शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख आनंद पाटील बोढारकर यांच्या उपस्थितीत मुलांना वही पेन व फळे वाटप करण्यात आले.
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १६ डिसेंबर रोजी फळे व वही पेन वाटप करण्यात आले यावेळी महिला जिल्हा प्रमुख गीताताई पुरोहित ,तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, सिडको शहर प्रमुख सुहास खराने पाटील, बादल सिंघ ,आकाश गजभारे, ढाकणीकर ,रावसाहेब तारू, ज्योत सिंघ बावरी, राजेश गायकवाड, शंकर सुरेवाड, ,दया वाघमारे, गजानन गजले,श्रीकांत गुंडाळे ,चंदू कांबळे, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ कंधारे तर आभार कर्यक्रमाचे आयोजक पप्पू गायकवाड यांनी केले.