उस्माननगर| येथून जवळच असलेल्या मौजे घोडज तांडा ता.कंधार येथे नार्बाड व स.स.मंडळ सगरोळी अंतर्गत वीरपक्षी ऋषी महाराज पाणलोट समिती घोडज अंतर्गत घोडजतांडा येथे जनावरांचे वंध्यत्व तपासणी व जनावरांना होणाऱ्या विविध आजारावरील लसीकरणास पशु पालकांनी जनावरांची तपासणी करून शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील डॉक्टर निहाल मुल्ला सर , हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते तर (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी) कार्यालय अंतर्गत डॉक्टर खूपसे ( पशुधन पर्यवेक्षक कंधार) परिक्षित भगवान नखाते ( पशुसहायक ) , रमाकांत मुंडे ( पशुसहायक) सिध्देश्वर लुंगारे ( पशुसहायक) कंदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी सर्व मान्यवरांचा येथे सत्कार करण्यात आला.
त्यानंतर डॉक्टर निहाल यांनी जनावरांमध्ये वंध्यत्व येण्याचे कारण सांगितले व तसेच पशुपालन मध्ये शेळीपालन , म्हैस पाळणे, कुक्कुटपालन, गायी पालन करणे ,व हवामान बदलनुसार जनावरांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणाम व त्यांची काळजी घेणे याविषयी डॉक्टर निहाल यांनी माहिती दिली. पुढे बोलताना म्हणाले की ,पशुमध्ये वंध्यत्व येणे म्हणजे पशु माजावर न येणे , गर्भधारणा न करणे ,गाय माजावर न येणे , जनावर माज दाखवती,पण गर्भधारणा होत नाही. अशा अनेक आजारावर विविध पशु मध्ये पैदास करण्यासाठी अडचणी येतात .याची सखोल माहिती दिली.लसीकरणामध्ये लाळ खुरकत ( FMD ) लस ही जनावरांना देण्यात आली.
यावेळी पशुनां औषधी देवून जनावरांची तपासणी व लसीकरण करून जनावरांचे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जनावरांच्या कानाला बिले मारण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीपकुमार भिसे यांनी केले . जनावरांचे वंध्यत्व तपासणी व लसीकरण शिबिरास परिसरातील पशुं पालकांनी आपल्या पशुनां घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद ईरशाद ,लक्ष्मण चव्हाण , पंडित राठोड यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.