नायगाव, रामप्रसाद चन्नावार| ग्रामीण भागातील सर्वाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे 5 % निधी आणी ह्याच प्रश्नासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांनी अचानक कांही कामानिमीत्त पंचायत समिती नायगाव येथे आलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना भेटून निवेदन देण्यात आले.
या निवेदनात स्थानिक स्वराज्य संस्थेचा 5 % निधी हा ग्रामपंचायत च्या स्व उत्पनातून न देता तो 15 व्या वित्त आयोगातून द्यावा अशी मागणी केली आहे. या वेळी गटविकास अधिकारी श्री वाजे,दिव्यांग कक्ष प्रमुख श्रीयुत धोटे, तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड,नांदेड जि.कार्याध्यक्ष गोपिनाथ मुंडे सांगविकर,जि संपर्क प्रमुख राजेश बेळगे ,नायगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख चांदू आंबटवाड,दिगंबर मुदखेडे व ईतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.