चारचाकी-मोटारसायकल आपघातात बापलेक जागीच ठार;भोकरजवळील सुधा प्रकल्पावरील घटना
भोकर। ऊसतोडणीच्या कामासाठी जाणाऱ्या बापलेकाच्या मोटरसायकलला टाटा २०७ची धडक लागून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भोकर-हिमायतनगर रस्त्यावरील सुधा प्रकल्पाजवळ ३०नोंव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.
नायगाव तालुक्यातील कुंचेली तांडा येथील रहिवासी असलेले लखन शंकर राठोड (वय२७)हा आपले वडील यांच्यासह शंकर आप्पाराव राठोड (५५)यांना हिरो कंपनीच्या स्पेल्डर मोटारसायकल क्रमांक एम.एच.२६सी.सी.१३३०वर ऊसतोडणीच्या कामासाठी हिमायतनगर तालुक्यातील अंदेगाव येथे जात होते.
सुधा प्रकल्पावरील पुलजवळ येताच टाटा २०७या चारचाकीची मोटारसायकला जोराची धडक बसल्याने बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरील घटना कळताच भोकर पोलीस स्टेशनचे पो. हे. काँ कानगुले, भिमराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.आपघातात ठार झालेल्या बापलेकांचा मृतदेह भोकरला आणण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते जुनेद पटेल , सोहेल , निजाम मास यांनी मदत केली.