नांदेड| अन्याय करणाऱ्यांपरेक्षा अन्याय सहन करणारा जास्त ग्रुन्हेगार असतो या उक्तीला धरून हिमायतनगर तालुक्यातील विद्यार्थी शनिवारी, दि. 25 नोव्हेंबर 2023 पासून नांदेड येथील स्वामी रामानंद विद्यापीठ समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
उपोषणकर्त्यानी PET -2022 च्या रिक्त असलेल्या जागेवर तात्काळ प्रवेश देण्यात यावा, PET – 2022 नुसार पात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठाने प्रवेश दिला आहे, त्याची यादी (विद्यार्थ्यांचे नाव, जात, जातप्रवर्ग, गुण) यानुसार विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी, PET – परीक्षेच्या रिस्पॉन्स शीट विद्यार्थ्यांना का देण्यात आली नाही याचा खुलासा करावा, गेल्या २० दिवसापासून आम्ही विद्यापीठाच्या परिसरात प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत कुलगुरूंनी आम्हाला आश्वासन दिले. परंतु अद्याप आम्हाला प्रवेश देण्यात आलेला नाही. या मानसिक छळास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी.
PET – 2022 च्या परिक्षेत वापरण्यात आलेल्या बोगस सॉफ्टवेअर खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी, PET – 2022 च्या परिक्षेत चुकीचे आलेल्या प्रश्नांचे अतिरिक्त गुण म्हणुन वाढवुन का देण्यात आले नाहीत याचा खुलासा करावा. PET -2022 ची परिक्षा देतेवेळेस कॅम्प्युटर स्क्रीनवर इतर विद्यार्थ्यांचे नाव, फोटो आलेले असतांना पडलेले गुण हे कोणाचे आहेत याचा खुलासा करावा. उपोषण स्थळी आमच्यावर काही भ्याड हल्ला अथवा धमकी या मानसीक तणाव अथवा इतर काही घडल्यास आमचे काही बरे वाईट झाल्यास यास जबाबदार विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, रजिस्टार, सहाय्यक रजिस्टार हे राहतील याची नोंद घ्यावी. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
आज उपोषणाचा चौथा दिवस असून, याठिकाणी नांदेड जल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याचे भवरे यशवंत, नलावडे रितीषा, गव्हाणे अनुजा हे तिघेजण बसले आहेत. दि. २७ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी खुप मोठा पाऊस झाल्याने, उपोषण स्थळी सर्वत्र पाणी व चिखल झाला होता. काल रात्री उपोषणकर्ती विद्यार्थी रितिषा नलावडे यांच्या पायाजवळ साप आल्यामुळे ते मुख्य ईमारतीच्या तळमजल्यावर गेले. आजपण उपोषणस्थळी चिखल आहे आणि साप निघण्याची भिती वाटत असल्याने सेक्युरिटी गार्ड यांची परवानगी घेऊन विद्यापीठाच्या मुख्य ईमारतीच्या तळमजला या ठिकाणी थांबले असल्याचे उपोषणकर्त्यानी सांगितले आहे.