नांदेड,अनिल मादसवार| राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी अधिकाऱ्यांना शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करा या मागणीसाठी मागील महिन्याभरापासून नांदेड येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुद्दत कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान आज सहभागी झालेल्या महिला पुरुष आंदोलकांनी चक्क जिल्हा परिषद कार्यालयातील सर्वच कक्षात भिक मागवा आंदोलन करून शासनाला नियमित पदावर थेट समायोजन करा अशी मागणी केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हा कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची इच्छा मुळीच नाही पण शासनाच्या वेळ काढून धोरणामुळे आम्हाला हा मार्ग पत्करावा लागत आहे आजपर्यंत अनेक बैठकी झाल्या पण कंत्राटी कर्मचाऱ्यांना आश्वासनाशिवाय दुसरे काही मिळाले नाही. यापुढे बैठक लावताना ननिर्णयात्मक व सकारात्मक बैठकीचे आयोजन करण्यात यावे, सदर बैठकीत आमची एकच मागणी असलेली सेवा समायोजन ही पूर्ण करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. देण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी ग्रामीण व एन यु एच एम अंतर्गत कार्यरत असलेल्या एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शितील करून रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तांत्रिक व अतांत्रिक पदावर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश नियम त्वरित तयार करून तात्काळ सेवा समायोजन करावे.
ज्या तांत्रिक व अतांत्रिक पदाचे सेवा प्रवेश नियम हे तयार आहेत त्या पदांचे प्रथम टप्प्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागाचे आरोग्य विभागातील मंजूर रिक्त पदावर थेट सेवा समायोजन करण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन धोरण लागू करा. एन एच एम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एच आर पॉलिसी त्वरित लागू करा, एन एच एम अंतर्गत कार्यरत सर्वाधिकारी कर्मचाऱ्यांना ईपीएफ योजनेचा लाभ तरी द्या. तसेच ईएसआयसी योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा, एन एच एम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांना इएसआयसी योजनेचा लाभ त्वरित देण्यात येऊन त्वरित लागू करण्यात यावा, सन 2018 मध्ये वेतन सुसूत्रीकरणात जुन्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अन्याय झालेला आहे.
त्यांना कुठल्याच प्रकारची वेतन वाढ करण्यात आलेले नाही अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्वरित सन 2018 पासून सुसूत्रीकरण लाभ पूर्वलक्षी प्रभावपणे तात्काळ द्या, शासकीय नियमाप्रमाणे अर्जित रजा वैद्यकीय वैद्यकीय रजेचा लाभ तात्काळ देण्यात यावा अश्यामागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर नीलकंठ ठवळी, प्रफुल्ल पोहणे, सनी कांबळे, पवन वासनिक, दिलीप उटाणे, यांच्यासह शेकडो आरोग्य विभागातील एनएचएम महिला पुरुष कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान आज दिनांक 23 रोजी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मांडून सायंकाळी तीन वाजता भीक मागो आंदोलन करून जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व कक्षात चंदा गोळा केला आहे. तसेच शासनाने आम्हाला तत्काळ समावेश करून घ्यावे अशी मागणी ही लावून धरली आहे.