सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड योजना उपयुक्त – डॉ.किरण दुलेवाड यांचे प्रतिपाद
उस्माननगर, माणिक भिसे| प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी दवाखान्यात पाच लाखांपर्यंतचे आरोग्य उपचार देण्यात येणार आहेत . त्यासाठी प्रत्येकाने व विशेष सर्वसाधारण नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण दुलेवाड यांनी केले.
उस्माननगर येथील अण्णा भाऊ साठे समाज मंदिर येथे कोलबंस व्हर्सेटाईल सोशल फाउंडेशन व जाॅन ड्युइ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आणि समस्त गावकऱी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घघाटन डॉ.किरण दुलेवाड यांच्या हस्ते झाले.सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न, थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दुलेवाड या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव भिसे ( मा.जि.प.सदस्य प्रतिनिधी ) ,अंगुलिकुमार सोनसळे ( ग्रा.पं.सदस्य ) ,. सौ. श्रीराम पाटील काळम ,प्रा.विजय भिसे , पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे, सुर्यकांत माली पाटील , गंगाधर भिसे , वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लोणे , डॉ.जगदीश कांबळे , डॉ.शेख ,शेख फेरोज ,इटकापल्ले ( आरोग्य कर्मचारी ) आदींची उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर प्रस्ताविकामध्ये संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष प्रा.नागन भिसे यांनी संस्थेचे ध्येय, धोरण , उद्दिष्ट व शिक्षणाचे महत्त्व , शिबिराचे आयोजन करण्या मागचे कारण विशद केले.पुढं बोलताना डॉ.दुलेवाड म्हणाल्या की , कोलंबस व्हसेंटाईल सोशल फाउंडेशन व जाॅन ड्युइ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आणि समस्त गावकऱी यांनी आयोजित केलेल्या शिबिराचे व संस्थेच्या विधायक उपक्रमाचे कौतुक केले.सर्वसामन्य नागरिकांना या सुविधा विकत घेऊ शकत नाहीत.अशा कार्यक्रमाची समाजाला आवश्यकता असते.हा उपक्रम स्तुत्य उपक्रम घेतल्या बद्दल संस्थेला शुभेच्छा दिल्या. दिवसभर गरजू रुग्णांनी आरोग्य तपासणी करून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले.दिवसभर शंभरच्या वर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी प्रा.विजय भिसे यांच्यसह अनेकांनी आपले विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रुपेश भिसे यांनी मानले. यावेळी राजाराम सोनटक्के , राजेश भिसे , मारोती वाघमारे , सखाराम भिसे , छत्रपती भिसे , कैवल्य भिसे ,सौ.पुनम नागन भिसे ,सौ. डिगाबंर भिसे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.