नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे आयोजित राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धा दि. ०७ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत धुळे येथे होणार आहेत.
या स्पर्धेसाठी लातूर विभागातून नांदेड येथील महात्मा कबीर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाच्या वयोगट १४ वर्ष आणि वयोगट १७ वर्ष मुले व मुली राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळ्याला रवाना झाले आहेत. रवाना होणार्या संघांना भंते शिलरत्न थेरो, शाळेचे सचिव प्रविणकुमार कुपटीकर, मुख्याध्यापक (मा.) आर.पी. कोकलेगावकर, मुख्याध्यापक (प्रा.) एस.एस. जोशी, सहशिक्षक रामजी गायकवाड, नांदेड जिल्हा नेटबॉल असो. चे सहसचिव रविकुमार बकवाड, बुध्दकिर्ती चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव राजेश बिर्हाडे, सहशिक्षक शिंदे एम.ए. यांनी शुभेच्छा दिल्या.
संघासोबत कोच म्हणून सुमेध गायकवाड तर संघ व्यवस्थापक म्हणून यश गायकवाड आणि करण धुताडे तर मुलीच्या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून प्रिती लोखंडे आणि प्रतिक्षा सोनकांबळे संघासोबत काम पाहत आहेत.