
नवीन नांदेड। शिवजन्मोत्सव व महाशिवरात्री निमित्ताने मराठवाडा केसरी व नांदेड केसरी कुस्त्यांची भव्य दंगल मध्ये प्रथम ५१ हजार व चांदीची गदा विदर्भ वाशीम येथील विजय शिंदे यांनी तर २१ हजार व चांदीची गदा, राजु कदम निळा तालुका नांदेड ,२१ हजार , चांदीची गदा माळेगाव केसरी अच्युत टरके किवळा यांनी कुस्ती दंगल मध्ये जिकुंन मिळवली असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस चांदीची गदा देण्यात आली हि कुस्ती दंगल दुपारी ३ ते रात्री उशिरा पर्यंत चालू होती, या दंगली मध्ये सुमारे ३५० कुस्ती संपन्न झाली, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक नामवंत पहेलवान यांनी सहभाग नोंदविला होता.
प्रथमच यावर्षी भव्य कुस्ती दंगल १३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता श्री शिवानंद मंदिर धुमाळवाडी असरजन येथे आयोजक नारायण पाटील लुटे,पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव, शंकरराव हंबर्डे, गोविंदराव पाटील धुमाळ, दादाराव पाटील, तातेराव जाधव बळीराम वैध व समस्त गावकरी मंडळी असरजन यांच्या वतीने करण्यात आले होते, यात ५ लाख रुपयांचा कुस्ती भव्य दंगल आयोजन करण्यात आले,या स्पर्धेचे उद्घाटन शंकरराव हंबर्डे, धारोजी हंबर्डे माजी नगरसेवक राजु गोरे,जगजीत सिह गाडीवाले,संतोष गाढे, यांच्या सह रावसाहेब पाटील मंगल सांगवीकर, बालाजी पाटील,नारायण पैलवान वासरीकर,ऊसमान मोमीन नगरध्याक्ष जळकोट, पंडित केंद्रे,लातुर पोलीस,बाबुराव पाटील शिंदे येलुरकर,व उपस्थित मान्यवरांच्या पंच कमिटी व आयोजन समितीचा उपस्थित करण्यात आले.
गुरुवर्य रविकिरण डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच यावर्षी शिवजन्मोत्सव व महाशिवरात्रीच्या निमित्ताने असरजन धुमाळवाडी गावकरी व आयोजक यांच्या वतीने भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली होती,चांदी गदा प्रथम ५१ हजार, कै.बापुराव पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ ,चांदीची गदा व केसरी २१ हजार, हंबर्डे ब्यूरो केअर युरोलाजी व सर्जिकल सुपर स्पेशालिटी नांदेड यांच्या वतीने २१ हजार मनपा नगरसेवक राजु गोरे यांच्या वतीने,रवि किरण डोईफोडे नांदेड जिल्हा कुस्तीगिर संघ यांच्या कडून, ११ हजार, कै.मुंजाजी बकाल व्यायाम शाळा क्रांती नगर असरजन, ११ हजार सुनिल साहेबराव काळे कौठा नांदेड यांच्या वतीने ११ हजार साठी शेरूसिंग बावरी असरजन नांदेड यांच्या तर्फे, ११ हजार कै.पांडुरंग मामा लुटे पाटील यांच्या स्मरणार्थ व इतर अनेक जणांनी विविध पारितोषिके आशी ५ लाख रुपये पारितोषिक वाटप करण्यात आली.
या स्पर्धेत वस्ताद पंच कमिटी म्हणून सरदार जगतसिंग गाडीवाले, तुलजाराम यादव,विठ्ठल पाटील ब्रम्हा णवाडा,दिलीपसिंग गाडीवाले,रमेश वस्ताद, मारोतराव तेलंग,जगन्नाथ टरके,अमोल कंकाळ,यांनी काम पाहिले तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागाल येथुन सुप्रसिद्ध हलकी वादक सुनिलराज नागरपोळे व संच यांनी वेळोवेळी हलकी व सनई वाजवून कुस्ती दंगल रोमहर्षक होण्यासाठी प्रतिसाद व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत होते, या दंगल सामन्याचे कुस्ती निवेदक भालचंद्र रणशुर यांनी आपल्या वेळोवेळी गोड आवाजातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले,यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक पहैलवानाचा जवळपास ३५० कुस्ती दंगल संपन्न झाली ,तर यावेळी परराज्यातील कुस्ती पैहलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कुस्ती दंगल मध्ये नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत, प्रथमच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भव्य कुस्ती दंगल साठी हजारो नागरिक युवक, पहेलवान यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
