उमरखेड। 21 फेब्रुवारी च्या मध्यरात्री शहरातील खासगी एटीएम फोडून 2 लाख 20 हजार 300 रुपये लंपास केलेले आरोपींना छत्रपती संभाजी नगर येथून तब्बल 38 दिवसांनी हरियाना राज्यातील 5 जणांना ताब्यात घेण्यात उमरखेड पोलीसांना यश आले आहे . त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाचही जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
यातील हरियाना राज्यातील सर्व आरोपी मुस्ताफ जान मोहमंद जान उतावर वय 32 ता हथीन जि . पलवल , आस मोहमंद सिरदार खान वय 25 जमालगढ , सहीकल रशीद खान वय 25 रसुलपूरा , इरफान सुलेमान खान वय 42 जमालगढ , हरीस हुसैन कुर्सिद 45 गुरास्कर सर्व हरियाना राज्यातील असून सदर आरोपी हे एटीएम फोडल्या प्रकरणात छत्रपती संभाजी नगर येथील कारागृहात होते.
न्यायालयाच्या परवानगीने त्यांचे दि. 31 मार्च रोजी उमरखेड पोलीसांकडे हस्तांतर करण्यात आले . आज 1 एप्रील रोजी त्यांना उमरखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात एपीआय सारीका राऊत, गीरजप्पा मुसळे अंकुश दरबस्तवार , मोहन चाटे करीत आहेत .