नांदेड| मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 21/12/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मंलगबाबा बिल्डींग जवळील इदगाहच्या मैदानावर खुदबेनगर, नांदेड येथे जनावर चोरी करणारे पाच ते सहा इसम त्यांचे फोर्ड कंपनीचे गाडीसह थांबलेले आहेत अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने मंलगबाबा बिल्डींग जवळील इदगाहच्या मैदानावर खुदबेनगर, नांदेड येथे सापळा रचुन आरोपी नामे 1) रिजवान खान इतीया खान वय 33 वर्ष रा. मापोली ता. भिंवडी जि. ठाणे 2) मोहमद फेरोज ऊर्फ समीर पि. मोहमद सलीम वय 30 वर्ष रा टायरबोर्ड बिलालनगर, नांदेड 3) समीर ऊर्फ बच्ची कुरेशी पि. अनिस कुरेशी वय 22 वर्ष रा कसाईवाडा, निजामपुर जि. ठाणे 4) मोहमद शोयब मोहम शफील वय 21 वर्ष रा. मंडई इतवारा, नांदेड 5) मोहम्मद इक्राम ऊर्फ वाजीद पि इस्माईल वय 26 वर्ष रा. खुदबेनगर चौरस्ता नांदेड 6) चाँद ऊर्फ चंदु पि. जमाल शेख वय 36 वर्ष रा. हिलालनगर, टायरबोर्ड नांदेड यांना ताब्यात
घेतले. आणि विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी जनावर चोरीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली असुन चोरी केलेले जनावरे इसम नामे 7) सयद सोहेल सयद फारुख वय 38 वर्ष रा बळेगाव ता उमरी 8) शेख खाजीद ऊर्फ सदो पि. शेख याशीन रा तुराबगल्ली देगलुरनाका, नांदेड यांना विक्री केल्याचे सांगीतले आहे. नमुद आरोपीतांचे ताब्यातुन नगदी 2,40,000/- रुपये व जनावरे चोरी करण्यासाठी वापरलेली एक फोर्ड कंपनीची कार व मोबाईल असा एकुण 4,01,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपीतांना पोलीस ठाणे अर्धापुर गु.र.नं. 446/2023 कलम 379 भा द वि गुन्हयाचे पुढील तपासकामी अर्धापुर पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि दत्तात्रय काळे, अशिष बोराटे, पोहेकॉ गंगाधर कदम, बालाजी तेलंग, पोकॉ/ विलास कदम, गणेश धुमाळ, विठ्ठल शेळके, गजानन बयनवाड, रणधीर राजबन्सी, मोतीराम पवार, ज्वालासिंघ बावरी, धम्मा जाधव, चालक हनुमानसिंह ठाकुर, शेख कलीम स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.