नांदेड। ऐन गणेशोत्सव सणाच्या काळात नांदेड शहरात एका पाणीपुरी विक्रेत्यास 2 गावठी कट्टे आणि 5 जिवंत काडतूसांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानं मध्यप्रदेशमधून गावठी कट्टे आणि काडतूसं विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक. 22/09/2023 रोजी सकाळ पासुन गणपती अनुशंगाने पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करणेकरीता पोलीस स्टेशन शिवाजीनगर हददीत गणपती स्थळी भेटी देने व पेट्रोलींग सुरु केली होती. दरम्यान गस्त करत असतांना गुन्हे शोध पथकातील पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नविन मोंढा, नांदेड येथील मार्केट कमिटीचे पाठीमागे एक इसम गावठी कट्टा विक्री करनार आहे.
अशी खात्रीशीर माहीती मिळाल्यावरुन सदर माहीती ही वरिष्ठांना देवुन गुन्हे शोध पथकातील पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे व पथकातील कर्मचारी असे नविन मोंढा येथील मार्केट कमीटीच्या पाठीमागे सापळा लावुन बसले. आणि आरोपी संजय लोकेंद्रसिंह परिहार वय 26 वर्ष, व्यवसाय- पाणीपुरी रा. बिल्हेटी ता. भांडेर जि. दतीया, राज्य मध्य प्रदेश ह.मु. प्रफुलनगर, चिखलवाडी, ता. भोकर, जि.नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन दोन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुस असा एकुण किंमती 30,000/- रु चा मुद्देमाल जप्त करुन गु. रनं 319 / 23 कलम 3/25 आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराव धरणे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, पोलीस निरीक्षक मोहन भोसले पोलीस स्टेशन शिवाजीनगर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे, व पो.हे.कॉ / 835 रविशंकर बामणे, पोकॉ/ देवसिंग सिंगल, शेख अझहर, लिंबाजी राठोड, विष्णु डफडे, तसेच चार्ली पथकाती आकाश सावंत, सय्यद मुजाईद, प्रशांत गजभारे व सायबर सेलचे राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली.