धर्म-अध्यात्मनांदेड

सिडको येथील भगवान बालाजी मंदीराच्या ३४ वा वार्षीक ब्रम्होत्सवाला सुरूवात

नवीन नांदेड। श्री भगवान बालाजीं मंदिर सिडकोचा ३४ वा वार्षिक ब्रम्होत्सवाला ८ जुन पासुन सुरूवात झाली असून दैनंदिन होम,हवन विधी व श्रीमद् भागवत कथा पारायण सोहळा भागवत कथाकार हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या समधुर वाणीतून दररोज दुपारी १ ते ४ आयोजित करण्यात आला आहे.

सर्व भाविक भक्तांना कळविण्यात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षींही श्री भगवान बालाजीचा ब्रम्होत्सव दि.०८ ते दि. १६ जुन २४ पर्यंत सपंन्न होत आहे. दि.१२ ते दि.१६ जुन २४ या कालावधीत आचार्य पंडीत सतिष गुरु सिडको व मंदिर पुजारी दिव्यांशु महाराज यांचे आचार्य तत्वाने विधीपूर्वक संपन्न होत आहे. सकाळी अभिषेक, होम हवन होईल. दि.०८ ते दि.१६ जुन २४ रोज दुपारी १.०० ते ४.०० पर्यंत भागवताचार्य श्री अनिल महाराज माजलगावकर यांच्या अधिपत्याखाली श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.१४ जुन २४ रोजी सकाळी ठिक ७ वाजता १०८ कलशाभिषेक करण्यात येणार आहे. व सकाळी ११ वाजता कल्याण उत्सव श्री भगवान बालाजी लक्ष्मी प‌द्मावती लग्न सोहळा पार पडणार आहे. व दि.१५ जुन २४ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता श्री भगवान बालाजी व लक्ष्मी प‌द्मावती उत्सव मूर्तीची भव्य मिरवणूक मंगलगिरी वाहनातून मंदिरापासून मेन रोड डॉ. रायेवार यांचा दवाखाना शिवमंदिर, संभाजी चौक एन.डी.४१ मार्गे मंदिराकडे येणार आहे. मिरवणुकी सोबत महिला व पुरुष भजनी मंडळ राहणार आहेत. व दि. १६ जुन २४ रोजी सकाळी महाअभिषेक,आरती, तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा व नंतर होम, हवन पूर्णाहुती ब्राह्मण सन्मान महाआशिर्वाद सकाळी ११.३० ते १.३० काल्याचे कीर्तन ह.भ.प. अनिल महाराज माजल गावकर यांचे होईल.

काल्याचे कीर्तना नंतर महाप्रसाद (भंडारा) होईल भागवत कथेचे यजमान रामचंद्र शंकरराव कोटलवार, एम.आय.डी.सी. नांदेड आहेत,या ब्रम्होत्सव कार्यक्रम मध्ये भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष साहेबराव भिमराव जाधव, बाबुराव मारोतराव बिरादार सचिव , व्यंकटराव कोंडलराव हाडोळे ,विश्वस्त सदस्य तुकाराम मल्लीकार्जुन नांदेडकर,आनंद रामभाऊ बासटवार,डॉ.नरेश शंकरराव रायेवार, गोविंद राजाराम सुकेवार ,पुरुषोत्तम शंकरराव जवादवार, वैजनाथ बालाजी मोरलवार,रामचंद्र शंकरराव कोटलवार,पुंडलिक रावसाहेब बिरादार,सर्व उत्सव समिती श्री भगवान बालाजी मंदिर, सिडको, नांदेड यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!