हिंगोली/हिमायतनगर,अनिल मादसवार| इतर कारखान्यापेक्षा एक महिना उशिराने कारखाना सुरु होत असला तरी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा फायदा व्हावा म्हणून यंदा आमच्या कारखान्याकडून उसाला २ हजार ६०० रुपयाचा भाव देत आहोत. अन्य कोणत्याही कारखान्याने याही पेक्षा अधिकचा भाव दिल्यास त्यापेक्षा ५१ रुपये जास्तीचा भाव आम्ही देऊ असे आश्वासन हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी उपस्थिताना दिले.
पुसद तालुक्यातील वसंतनगर पोफळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन ऊस गाळप सोहळा दि.१७ डिसेंबर रोजी संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना खा.हेमंत पाटील म्हणाले कि, शेतकऱ्यांची कामधेनू असलेला वसंत कारखाना मागील सात वर्षपासून बंद पडलेला होता. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खा.श्रीकांत शिंदे साहेबामुळे २०२२ ला हा साखर कारखाना सुरु झाल्याने पहिले गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे असेही ते म्हणाले.
यावेळी चितांगराव कदम गुरुजी, नांदेड जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, बी.एन.चव्हाण काका, भीमराव पाटील चंद्रवंशी, डॉ.धोंडेकर, यवतमाळ जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार, अभय गड्डम, वैद्यराज पाटील, तालुका प्रमुख संतोष जाधव, प्रवीण पाटील मिराशे, तालुका प्रमुख जयदीप काकडे, तालुका प्रमुख संजू राठोड, रावते साहेब, सुदर्शन पाटील, अजयराव देशमुख, प्रितेश पाटील, संदिप ठाकरे, शेख मुसमुल्लाजी, बालआहेब खंदारे, सो.सोमेश्वर पतंगे, शेतकरी, कार्यकर्ते , कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.