शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मागील 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू
नांदेड। येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मागील 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने उडाली असून, गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. याची गंभीर दखल मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी जारी केले असून, आरोग्य आयुक्त आणि संचालक यांना तातडीने नांदेडला रवाना होण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी नुकतेच एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णामध्ये २४ तासात २४ रुग्ण दगावली गेली आहेत.
त्यामध्ये १२ बालरोगी असून, त्यापैकी ४८ तासात दाखल झालेले ०६ बाळांचा समावेश आहे. तर २४ तासात दाखल झालेलया ०६ बाळांचा समावेश होता. तर साप चावल्याने दोघांचा मृत्यू, गंभीर आजारामुळे ०७ जण दगावले, प्रसूतीमुळे ०१ आणि हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. एकूण २४ तासात २४ मृत्यू झाले आहेत, हि घटना खूप दुर्दैवी आहे.
प्रौढ रुग्णामध्ये 4 हृदयविकार, 1 विषबाधा, 1 जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, 3 अपघात व इतर आजार याप्रमाणे व बालकांपैकी 4 अंतिम अवस्थेत खाजगीतून संदर्भित झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये निधी देण्यात आला असून अजून 4 कोटी रुपये मंजूर झाला आहे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आलेले आहे. गेल्या दोन दिवसात अत्यवस्थ रुग्ण विशेषत: अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्ह्यातून व बाहेरून जास्त प्रमाणात आले आहेत. डॉक्टर व स्टाफ लक्ष ठेऊन आहेत. अनेक वर्षांपासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. दाखल असलेल्या इतर रुग्णांना आवश्यक तो औषधोपचार केला जात आहे असे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरीचे वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली.
सध्या वातावरण बदलामुळे खासगी रुग्णालय खाचखच्च भरलेली आहेत. त्या ठिकाणी उपचार करताना रुग्ण गंभीर झाले की, त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवीले जाते एकंदर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश असून, रुग्ण गंभीर होते असा दावा केला आहे. परंत्तू महिन्यापूर्वी ठाण्यात अशी घटना घडून गेल्यानंतरही आरोग्य खात्याला जाग आली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधितांवर कारवाई होणार – मंत्री हसन मुश्रीफ
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की घटनेची माहिती घेण्याचे काम सुरूआहे. जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मी स्वतः नांदेडला जाणार आहे. त्याआधी मी अधिकाऱ्यांना नांदेडला पाठवलं आहे. त्यांच्याकडून आढावा घेत असून, घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल. पैशाच्या कारणावरून डिस्चार्ज देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर चाप लावला जाणार असल्याचही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.