नवीन नांदेड| भायेगाव ता. जि .नांदेड येथील जिल्हा परिषद शाळा पंटागंणात शाळा दुरूस्ती अंतर्गत पेव्हर ब्लॉक १० लक्ष रुपयाचा कामाचे भुमीपुजन सोहळा प्रजासताक दिनाचे औचित्य साधुन २६ जानेवारी रोजी संपन्न झाला.
प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालय भायेगाव येथे सरपंच सौ. सविता बालाजी खोसडे यांच्या हस्ते ध्वजाहारोहण करण्यात आले,यावेळी उपसरपंच, सदस्य,गावातील नागरीक उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा भायेगाव येथे सरपंच सौ.सविता बालाजी पाटील खोसडे भायेगावकर,उपसरपंच बालाजी पाटील कोल्हे, पोलिस पाटील, सुमन शिवानंदन खोसडे,चेअरमन गोविंदराव पाटील कोल्हे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराव पाटील कोल्हे, ग्राम विकास अधीकारी एस एस वाकोरे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तिरमक पाटील कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य ऊर्मीला शंकर पाटील खोसडे, भानुदास पाटील कोल्हे,गौतम भालेराव, रामराव पाटील खोसडे, शंकर पाटील खोसडे, बालाजी यन्नावार,एच.एम.कल्याणकर , शिंदे ,घोरबांड ,उतरवार ,राजु वंसत कोल्हे, शंकर माधवराव कोल्हे, हानुमंत कोल्हे संतोष यन्नावार, यांच्या उपस्थितीत शाळा दुरूस्ती अंतर्गत पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक,शिक्षेकतर कर्मचारी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.