दिवाळी सणाच्या मुहूर्तावर ४ हजार २१५ लाभधारकांच्या बँक खात्यावर १ कोटी ८४ लक्ष ८३ हजार ३०० रुपयाचे अर्थसहाय्य जमा – तहसीलदार मंजुषा भगत
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभधारकांना दिवाळी सणाच्या मुहूर्तावर दि. ६ नोव्हेंबर रोजी एकूण ४ हजार २१५ लाभधारकांच्या बँक खात्यावर दर महा. १५०० या प्रमाणात ३ महिन्यांचे एकत्रितरित्या एकूण १ कोटी ८४ लक्ष ८३ हजार ३०० रुपये अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती नायगांव च्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी दिली आहे.
नायगाव तहसील कार्यालय संजय गांधी विभाग अंतर्गत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवॄती वेतन योजना असे दोन्ही प्रवर्गातील समावेश असलेले एकूण ४ हजार २१५ लाभधारकांचा समावेश आहे. अशी संजय गांधी निराधार व श्रावण बाळ राज्य निवॄती वेतन योजनेतील लाभधारकांची एकूण संख्या ४ हजार २१५ एवढी आहे. या सर्व लाभधारकांच्या बँक खात्यावर अनुदान वितरित करण्यात आले आहे.
सदरचे अनुदान लाभधारकांनी खात्री करूनच बँक अथवा पोस्ट कार्यालया मधून उचल करावे, असे मंजुषा भगत यांनी सांगितले आहे. या योजनेतील सर्व संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभधारकांचे जुलै, ऑगस्ट, व सप्टेंबर २०२३ चे अर्थसहाय्य अनुदान त्यांच्या वैयक्तिक पोस्ट पेमेंट खाते, स्टेट बँक ऑफ इंडिया, बि ओ आय .महाराष्ट्र ग्रामीण बँक. अशा विविध शाखेतील खात्यावर जमा करण्यात आले आहे. सदरील बँक खात्यावर एकूण रक्कम रुपये १,८४,८३,३००/ जमा करण्यात आले आहेत. तरी लाभधारकांनी प्रत्यक्ष बँकेत जाऊन आपापल्या अनुदानाची खात्री करून उचल करावे, असे आवाहन तहसीलदार मंजुषा भगत यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभधारकांना सुचित करण्यात येते की, आपण स्वतःचे हयात प्रमाणपत्र, २१००० / हजार रुपये मर्यादेपर्यंत उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र व मोबाईल नंबर तात्काळ तहसील कार्यालयात जमा करावे, आपण वेळेत वरील कागदपत्राची पूर्तता या कार्यालयात सादर न केल्यास आपल्याला सदरच्या अनुदानाची आवश्यकता नाही, असे समजून आपले पुढील ऑक्टोबर २०२३ चे अनुदान थांबवण्यात येईल, याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी.असे आवाहन तहसीलदार मंजुषा भगत यांनी केले आहे. सदरचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेत मिळावे यासाठी नायब तहसीलदार संजयकुमार देवराये ,पेशकार लक्ष्मण टेकाळे.महसुल सहाय्यक संदिप नांदेडकर.संगणक चालक भास्कर मोरे यांनी परिश्रम घेतले.