विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी ०१२३९/४०गोंदिया -करमाळी,०१२०१/०२ बल्लारशा – मडगाव,०१२५५/५६ चंद्रपूर – थिवीम या स्पेशल रेल्वेगाडी दिपावली,होळी,गणपती नियमित सुरु करा
नागपूर। विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी ०१२३९/४०गोंदिया -करमाळी,०१२०१/०२ बल्लारशा – मडगाव,०१२५५/५६चंद्रपूर – थिवीम या स्पेशल रेल्वेगाडी दिपावली,होळी,गणपती नियमित सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव,रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण – सावंतवाडी, राष्ट्रीय रेल्वे प्रवाशी संघटना शेगांव सरचिटणीस, वैभव बहुतूले यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग राजमार्ग परिवहन दळवळणमंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,नागपूर येथील महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभुमी, वर्धा येथील म.गांधीजींचा सेवाग्राम आश्रम, चंद्रपूर येथील महाकाली मंदिर, शेगांव भाविकांचे आराध्य दैवत श्री.गजानन महाराज तीर्थक्षेत्र ,बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंधखेड राजा (माँ जिजाऊ जन्मस्थळ), अमरावती जिल्ह्य़ातील संत गाडगेबाबा महाराज जन्मस्थळ मोझरी, नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मूर्तीजापूर कार्तिकस्वामी मंदिर दर्शनासाठी कोकणातील भाविक बुलढाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया परिसरात येत असतात. तसेच विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने कोकणात निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी येत असतात. ०१२३९/४०गोंदिया मडगाव १२०१/०२,०१२५५/५६ बल्लारशा मडगाव पासुन करमाळी गोवा/मडगाव, गोवा करीता नियमितपणे स्पेशल रेल्वेगाडी सुरु झाल्यास विदर्भातील प्रसिद्ध असलेली नागपुरी संत्री, हल्दीराम गुलाबजाम, श्रीखंड,आम्रखंड संत्राबर्फी, सोनपापडी,शेगांव प्रसिद्ध शेगांव कचोरी याचा स्वाद कोकणवासीयांना कोकणातच घेता येणार आहे. कोकणातील रत्नागिरीचा हापूस आंबा,सिंधुदुर्गचा देवगड हापूस आंबा मालवणी खाजा, कडक बुंदी लाडू, सावंतवाडी जिल्ह्य़ातील लाकडी खेळणी, रायगडचा पांढरा कांदा, पापड कुरडई, लोणची इ. आयात-निर्यात केल्याने विदर्भातील व कोकणातील उद्योगात –बाजारपेठेत वृद्धी व्हायला उपयुक्त ठरणार आहे याद्वारे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार होऊन रेल्वे विभागाला महसूल प्राप्त होईल.
मध्य रेल्वे प्रशासनाने ०१२३९/४०गोंदिया ते मडगाव,०१२०१/०२ बल्लारशा ते करमाळी,०१२५५/५६चंद्रपूर ते थिवीम स्पेशल एक्स्प्रेस दिपावली,होळी,गणपती,समर एक्स्प्रेस नियमित चालवण्यासाठी मंजुरी दिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. सुशिक्षित बेरोजगारांना ही रोजगार उपलब्ध होईल, रेल्वे विभागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात राजस्व प्राप्त होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून ०१२३९/४०गोंदिया मडगाव, ०१२०१/०२चंद्रपूर थिवीम, ०१२५५/५६बल्लारशा करमाळी दिपावली,गणपती,होळी,समर स्पेशलकरिता स्पेशल रेल्वे प्रशासनाने गणपती,दिपावली,होळी तसेच समर स्पेशल रेल्वेसेवा सुरु करावी,अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, प्रवासी संघटना शेगांव-अखिल भारतीय ग्राहक पंचायत शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी संस्थापक अध्यक्ष श्री.सुनिल उत्तेकर राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,संघटनमंत्री श्री.ओमकार माळगांवकर,संपर्कप्रमुख हर्षल भगत,चैतन्य धुरी यांनी केंद्रीय कोळसा खाण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग, राजमार्ग परिवहन दळवळणमंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.